
पालघर | प्रतिनिधी
“दिव्या खाली अंधार” ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरत असून मनोर–वाडा रोडवरील नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. ते तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून बुजविण्यात आले होते. मात्र आता पावसाळा संपताच याच मुरूमामुळे रस्त्यावर प्रचंड धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून, या धुळीच्या वादळामुळे रस्त्याने ये-जा करणारे नागरिक, दुचाकीस्वार, वाहन चालक तसेच परिसरातील रहिवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत.
अवजड वाहनांची सततची वाहतूक असल्याने ही धूळ अधिक उडत असून दिवसभर हवेत धुळीचे ढगच दिसतात. त्यामुळे श्वसनाचे त्रास, हॉर्न व धुळीमुळे निर्माण होणारी दृष्यमानतेची समस्या, अपघाताची शक्यता या कारणांनी हा रस्ता नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः धुळीत भरकटले आहे.

या रस्त्यावर अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर धावतात. त्यामुळे धुळीचे प्रमाण अधिक वाढते. धुळीमुळे दृश्यमानता कमी होत असून अपघाताचा धोका कायम आहे. शिवाय श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, त्वचेच्या तक्रारी अशा अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. रस्त्यालगत राहणाऱ्यांचे तर दैनंदिन जीवन धुळीतच दडपले आहे.
स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत म्हटले आहे की,“पावसाळ्यात खड्ड्यांनी जीव मेटाकुटीला आणला होता, आता धुळीने जगू देत नाही. तात्पुरत्या उपाययोजना करून प्रशासन आपली जबाबदारी संपल्याचे समजते का?” विशेष म्हणजे याच रस्त्याने पालघरचे विद्यमान खासदार डॉ. हेमंत सावरा हे वाडा येथील आपल्या निवासस्थानातून पालघर मुख्यालयाकडे ये-जा करतात. मग असा प्रश्न नागरिक विचारत आहेत की, त्यांच्या नजरेत ही धुळीची समस्या दिसत नाही का…? की खरोखरच ‘दिव्या खाली अंधार’ आहे?
अवजड वाहनांची सततची वर्दळ असल्याने दिवसभर रस्त्यावर धुळीचे ढग तयार होतात. धुळीमुळे
- दृष्यमानता कमी होऊन अपघाताचा धोका
- नागरिकांना श्वसनाचे त्रास
- डोळ्यांची जळजळ
- आजारी, वृद्ध व लहान मुलांसाठी गंभीर समस्या
अशा अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. रस्त्यालगत राहणाऱ्या रहिवाशांचे तर संपूर्ण जीवनच धुळीत भरडले आहे.
स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत म्हटले आहे की,“पावसाळ्यात खड्डे, आता धूळ… प्रशासन फक्त तात्पुरते उपाय करून जबाबदारी संपल्यासारखे का वागत आहे?” स्थानिक नागरिकांनी तात्काळ रस्त्याचे सुसूत्रीकरण करण्याची, योग्य पद्धतीने डांबरीकरण किंवा कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. केवळ तात्पुरत्या उपायांनी नागरिकांची फसवणूक न करता, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी ठोस पावले उचलण्याची वेळ आता आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.
मुंबई पालघर न्यूज लवकरच पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या गण आणि गटाचे माजी सदस्यांन कडून झालेली कामे आणि कामातील भ्रष्टाचार या बाबत लवकरच सविस्तर बातमी पत्र सुरु करणार आहेत, वाचत रहा मुंबई पालघर न्यूज…….