पालघरच्या भारती निलेश पाटील यांची भाजपा समर्थक मंचाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षपदी नियुक्ती

Spread the love

पालघर | दुर्वा पाटील

भाजपा समर्थक मंचाच्या राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनियर अनमोल श्रीवास्तव यांच्या निर्देशानुसार आणि वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष विनोद सिंह यांच्या प्रस्तावावरून पालघर येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या श्रीमती भारती निलेश पाटील यांची भाजपा समर्थक मंचाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपा समर्थक मंच, नोंदणी क्र. 64/2017 चे राष्ट्रीय संघटन महामंत्री दीपक श्रीवास्तव यांनी दिनांक 27 जून 2026 रोजी पत्रांक 6869 अन्वये नियुक्तीपत्र जारी केले.

या पत्रात भारती पाटील यांनी संघटनेप्रती दाखविलेली निष्ठा, कार्यतत्परता आणि समर्पण लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पालघर शहरातील नवली फाटक परिसरातील रहिवासी असलेल्या भारती पाटील या अनेक सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत.

सध्या त्या भूमिपुत्र संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असून विविध सामाजिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आहेत.

तसेच त्या रेजिलेंट इंडिया या सामाजिक संस्थेच्या पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत.

रस्ता सुरक्षा (Road Safety) आणि ‘झिरो फॅटॅलिटी’ अभियानासाठी त्या विशेष कार्य करीत असून अपघातमुक्त रस्ते, वाहतूक जनजागृती आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले आहेत.

त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना पालघर जिल्ह्यात स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यश आले आहे.राजकीय क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

त्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. मोठ्या राजकीय नेत्यांन सोबत त्यांचे स्नेहपूर्ण संबंध असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते. विविध सामाजिक आणि राजकीय उपक्रमांमधून त्यांनी अनेक वर्षे जनसंपर्क वाढवला आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्ग अपघात मुक्त व्हावा या साठी त्यांच्या नेतृत्वात उपोषण सुद्धा करण्यात आले होते.

भाजपा समर्थक मंचाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीनंतर महिला सक्षमीकरण, संघटन विस्तार आणि सामाजिक प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याची संधी मिळणार असल्याची भावना भारती पाटील यांनी व्यक्त केली आहे.

संघटनेला अधिक गतिमान करण्यासाठी आणि महिला कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडण्यासाठी त्यांनी लवकरच विविध उपक्रम हाती घेण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, त्यांच्या या नियुक्तीबद्दल पालघर जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वगुणांचा लाभ भाजपा समर्थक मंचाला निश्चितच होईल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *