
पालघर | प्रतिनिधी
उमरोली परिसरात आज झालेल्या अपघातात ऑक्सिजन सिलेंडरने भरलेली पिकअप गाडी उलटल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात पिकअप गाडीच्या मागे असलेले स्कुटी वरील युवक व युवती बचावले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, पिकअपमधील ऑक्सिजन सिलेंडर अचानक हलल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व वाहन उलटले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत बचावकार्य केले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली.
सुदैवाने सिलेंडर फुटण्याची शक्यता टळली असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पुढील तपास पालघर पोलीस करत आहेत.
मुंबई पालघर न्यूज लवकरच पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या गण आणि गटाचे माजी सदस्यांन कडून झालेली कामे आणि कामातील भ्रष्टाचार या बाबत लवकरच सविस्तर बातमी पत्र सुरु करणार आहेत, वाचत रहा मुंबई पालघर न्यूज…….