
पालघर | सन्नान शेख
पालघर जिल्ह्यात औद्योगिक विकासाला नवे बळ देणारा महत्त्वाचा प्रकल्प समोर आला असून, विराज प्रोफाइल्स प्रा. लि. कंपनीने हॉट रोल्ड स्टेनलेस स्टील HRAP/CRAP शीट्स, प्लेट्स व कॉइल्स उत्पादनाच्या नियमितीकरण व विस्तारासाठी मौजे मान तसेच मौजे वरांगडे, ता. व जि. पालघर येथे प्रकल्प प्रस्तावित केला आहे.या प्रस्तावासंदर्भात Maharashtra Pollution Control Board (MPCB) यांनी सार्वजनिक सुनावणीचे आयोजन केले असून, ही सुनावणी ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता प्रस्तावित प्रकल्प स्थळी, एसआरएम प्लांट, मौजे मान येथे होणार आहे.कंपनीच्या मते, हा प्रकल्प स्वच्छ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक तत्त्वांवर आधारित असून, पर्यावरणीय कामगिरी सातत्याने सुधारण्याचा कंपनीचा स्पष्ट निर्धार आहे. विराज प्रोफाइल्सने शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि समाज विकास या क्षेत्रांत विविध CSR उपक्रम राबवून स्थानिक भागाच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान दिले आहे.सध्या सुमारे १३ हजार कर्मचारी कंपनीसोबत कार्यरत असून, ते प्रामुख्याने बोईसर परिसरात वास्तव्यास आहेत. गेल्या ३० वर्षांत कंपनीने बोईसरच्या आर्थिक प्रगतीत मोठा वाटा उचलला असल्याचे सांगितले जाते.नवीन विस्तार प्रकल्पामुळे ५,००० पेक्षा अधिक स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक युवकांना प्राधान्य देत गावांच्या आर्थिक उन्नतीस चालना देण्याचा कंपनीचा उद्देश आहे.कंपनीने समाज विकासासाठी ७ प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे :आरोग्य व स्वच्छता – गावांसाठी वैद्यकीय सुविधा, रुग्णवाहिका सेवा, महिलांच्या आरोग्याला प्राधान्यमहिला सक्षमीकरण – प्रशिक्षण, लघुउद्योगासाठी आर्थिक मदत व बाजारपेठ उपलब्धताशिक्षण – जिल्हा परिषद शाळांचे नूतनीकरण, डिजिटल साधने व दर्जा उंचावणेपायाभूत सुविधा विकास – पिण्याचे पाणी, सौर दिवे, रस्ते विकासकौशल्य विकास केंद्रे – युवकांसाठी तांत्रिक प्रशिक्षण व रोजगार संधीशिष्यवृत्ती योजना – १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर्यावरण व शाश्वतता – 2030 पर्यंत ‘near zero’ व त्यानंतर ‘net zero’ उद्दिष्ट, सौर-पवन ऊर्जा वापर व हरित पट्टा विकासदरम्यान, कंपनीने स्थानिक नागरिक व माध्यम प्रतिनिधींना या सार्वजनिक सुनावणीत सहभागी होण्याचे आणि प्रकल्पाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यात औद्योगिक विकासास चालना मिळण्यासोबतच रोजगार निर्मिती आणि सामाजिक प्रगतीला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
