Zp पालघर येथे ‘Good Samaritan 108’ ऍपची माहिती; आणि कर्मचाऱ्या ना एप चे प्रशिक्षण

Spread the love

पालघर | प्रतिनिधी

रुग्णांच्या आपत्कालीन सेवेसाठी बीव्हीजी (BVG) कंपनीतर्फे विकसित करण्यात आलेल्या ‘Good Samaritan 108’ या ऍपची माहिती आज zp पालघर येथे देण्यात आली. यावेळी डॉ. वेद व्यास मोरे आणि लक्ष्मण जाधव यांनी उपस्थितास ऍपच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या ऍपच्या माध्यमातून नागरिकांना अपघात किंवा इतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळवणे शक्य होणार आहे.

घटनास्थळाचे फोटो व व्हिडिओ अपलोड करून रुग्णाची स्थिती संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवता येते, ज्यामुळे वेळेवर रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास मदत होते.अधिकाऱ्यांनी सांगितले की, नागरिकांनी या ऍपचा जास्तीत जास्त वापर करून अपघातग्रस्तांना ‘गुड सेमेरिटन’ म्हणून मदतीचा हात द्यावा, जेणेकरून अनेकांचे जीव वाचू शकतील.

या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ रामदास मराड, DHO डॉ संतोष चौधरी, Matron – सौ रुपाली म्हसकर मॅडम, डॉ प्रशांत तांबे, डॉ वेदव्यास मोरे, डॉ प्रतिक पाटील, डॉ अब्दुल खान, अमित वडे, लक्ष्मण जाधव, संगीता मेहरम, रामा राजड etc मान्यवर उपस्थित होते पूर्ण जिल्ह्यातील 300+ हून अधिक परिचारिकांनि आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *