
पालघर | प्रतिनिधी
मुंबई तरुण भारत यांच्या वतीने आयोजित रस्ते सुरक्षा सोहळ्यात रेजिलेंट इंडिया संस्थेच्या सदस्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहन चालविण्याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. वाढत्या अपघातांचे प्रमाण लक्षात घेता तरुणांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला पालघरचे पोलिस अधीक्षक यतिश देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना, वाहतूक नियमांचे पालन करणे, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, वेगमर्यादा पाळणे तसेच मद्यपान करून वाहन न चालविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.


कार्यक्रमात रेजिलेंट इंडिया तर्फे राजीव चौबे, हर्बन्स सिंग नन्नाडे, मयूर ठाकूर, भारती पाटील आणि नितिन उन्नवे हे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुरक्षित वाहनचालनाचे प्रत्यक्ष अनुभव आणि उपयुक्त टिप्स दिल्या.
तसेच तरुण भारत तर्फे कमलेश संखे आणि आनंद वैद्य यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलेल्या या उपक्रमामुळे रस्ते सुरक्षेच्या संदेशाला बळ मिळाले असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.