
पालघर | मयूर ठाकूर
विधानसभेचे तिकीट न मिळाल्याने भावनिक होऊन फुटफुटून रडलेले आणि काही काळ घरातून गायब राहिलेले शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे गोवाहाटी रिटर्न आमदार श्रीनिवास वनगा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील कासा जवळील चिंचपाडा येथे त्यांनी ‘हॉटेल श्री पॅलेस’ नावाचे भव्य व आलिशान हॉटेल उभे केले आहे. या हॉटेलच्या उद्घाटनावेळी विविध पक्षातील अनेक नेत्यांनी हजेरी लावली असल्याची माहिती मिळत आहे.
सोयी–सुविधांनी परिपूर्ण असे हे हॉटेल उभारण्यात आल्याने परिसरातील व्यवसायिक आणि राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. एकीकडे राजकीय आरोप–प्रत्यारोप सुरू असताना, दुसरीकडे या आलिशान हॉटेलचे उद्घाटन मात्र मोठ्या थाटामाटात पार पडले.
या उदघाटनाला रडण्याच्या वेळी उपस्थित असणारे अदृश्य होते. पण श्रीनिवास वणगा यांच्या वेळी असलेले आमदार यांनी या उदघाटन कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शवली आहे.

मुंबई पालघर न्यूज लवकरच पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या गण आणि गटाचे माजी सदस्यांन कडून झालेली कामे आणि कामातील भ्रष्टाचार या बाबत लवकरच सविस्तर बातमी पत्र सुरु करणार आहेत, वाचत रहा मुंबई पालघर न्यूज…….