
वाडा | विजय बसवत
वाडा तालुक्यातील पाऊनी पाडा येथील दत्त मंदिरात आज दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची वर्दळ वाढू लागली होती. दत्त महाराजांच्या मूर्तीचे सुशोभित पूजन, अभिषेक व आरतीने कार्यक्रमाची सुरूवात झाली.

यावेळी दत्त गुरूंच्या जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भजन, कीर्तन, हरिपाठ यांसह दिवसभर धार्मिक वातावरण दुमदुमत राहिले. स्थानिक भाविक, महिला मंडळे तसेच युवकांच्या सहभागाने सोहळ्याला अधिकच रंगत आली.
दत्त जयंतीनिमित्त मंदिर परिसर आकर्षक फुलांच्या आरासेने सजविण्यात आला होता. भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने भेट देत दत्त महाराजांच्या चरणी मनोकामना व्यक्त केल्या. भक्तीमय वातावरणात दत्त जयंतीचा उत्सव यंदाही उत्साहात संपन्न झाला.