काँग्रेसची प्रचारात आघाडी, प्रभागनिहाय उमेदवारांवर मतदारांचे लक्ष

डहाणू | सन्नान शेख
डहाणू नगरपरिषद निवडणुकीची सरगर्मी दिवसेंदिवस वाढत असून काँग्रेस पक्ष स्थानिक पातळीवर जोरदार मोहीम राबवत आहे. प्रभागनिहाय मजबूत आणि ओळख असलेल्या दावेदारांमुळे काँग्रेसने प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याची चर्चा मतदारांत बरीच रंगत आहे. अनुभवी, तरुण आणि समाजकार्यात सतत सक्रिय असलेल्या चेहऱ्यांमुळे काँग्रेसचे पॅनल मतदारांच्या चर्चेत आले आहे.

प्रभाग 10 – अनुभवी पत्रकार रफीक घाची अग्रस्थानी
प्रभाग क्रमांक 10 मध्ये अनुभवी पत्रकार व समस्यांचे जाणकार म्हणून ओळख असलेल्या रफीक घाची यांची जोरदार चर्चा आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवणारे आणि स्थानिक प्रशासनातील त्रुटींवर प्रकाश टाकणारे घाची हे काँग्रेसचे मुख्य दावेदार मानले जात आहेत. प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते आणि नागरी सुविधांच्या प्रश्नांवर त्यांचा अभ्यास असल्याने मतदारांचा कल त्यांच्याकडे झुकताना दिसत आहे.

प्रभाग 6B – ॲड. जय मावळे यांना वाढती लोकप्रियता
कायदेशीर जाण, सुस्पष्ट भूमिका आणि सातत्याने सामाजिक कामांमध्ये सक्रिय सहभाग यामुळे ॲड. जय मावळे हे प्रभाग 6B मध्ये काँग्रेसचे मजबूत पर्याय म्हणून उदयास आले आहेत. तरुण मतदारांमध्ये त्यांचा चांगला प्रभाव असून वैयक्तिक संपर्क मोहिमेमुळे त्यांच्या नावाची चर्चा जोरात आहे.

प्रभाग 4B – समर्थ मल्हारीचा जोरदार दम
प्रभाग 4B मध्ये समर्थ मल्हारी हे काँग्रेसकडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत. स्थानिक पातळीवरील विविध विकासकामांत सहभाग व तरुण कार्यकर्त्यांचे मजबूत नेटवर्क या दोन गोष्टींमुळे समर्थ यांचा प्रचार दिवसेंदिवस गती घेत आहे. विशेषतः घराघरातील भेटी आणि युवा वोटर्समध्ये संवाद मोहिमेमुळे त्यांची छाप निर्माण झाली आहे.

प्रभाग 13 – प्रेम सागर पवारकडे मतदारांचा ओढा
प्रभाग 13 मध्ये प्रेम सागर पवार यांची गणना लोकप्रिय आणि लोकाभिमुख कार्यकर्त्यांमध्ये केली जाते. स्थानिक प्रश्नांवरील त्यांची सक्रियता, तसेच सामाजिक उपक्रमांमुळे पवार यांच्या उमेदवारीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणातही त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

प्रभाग 9 – नरेश दुबळा घरोघरी पोहोचत
प्रभाग 9 मध्ये नरेश दुबळा हे काँग्रेसचे चर्चेत असलेले दावेदार. प्रभागातील रस्ते, ड्रेनेज आणि स्वच्छतेसंबंधित प्रश्नांवर त्यांनी सातत्याने सक्रिय भूमिका घेतल्याने त्यांच्यावरील विश्वास वाढला आहे. कुटुंबप्रधान मतदारवर्ग आणि युवकांमधून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.काँग्रेसचा प्रचार मोड पूर्ण जोशातडहाणूत काँग्रेसने लवकरात लवकर आपली मोहीम सुरू करत जनसंपर्क, सोशल मीडिया आणि स्थानिक स्तरावरील सभा यांचा यशस्वी मेळ साधला आहे.घराघरातील भेटीस्थानिक समस्यांवरील अभ्यासपूर्ण मांडणीनव्या चेहऱ्यांची निवडयामुळे त्यांच्या प्रचाराला वेग आला आहे.
स्थानिक राजकीय समीकरणांनुसार काँग्रेस सध्या आघाडीवर असल्याची चर्चा असून, आगामी काही दिवसांत प्रचाराचा जोर आणखी वाढेल अशी शक्यता आहे.