डहाणू नगरपरिषद निवडणूक 2025:

Spread the love

काँग्रेस उमेदवार प्रचारात आघाडीवर? स्थानिक राजकारणात नवी हलचल

डहाणू | प्रतिनिधी

डहाणू नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असताना, काँग्रेस आपल्या संघटित प्रचारामुळे सध्या सर्वाधिक चर्चेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार वेग पकडत असून, घरोघरी संपर्क मोहिमा, महिलांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या विशेष उपक्रमांपासून तरुणांवर केंद्रित प्रचार पद्धतीमुळे पक्षाची दृश्यमानता वाढलेली दिसत आहे.

काँग्रेस कडून डहाणूतील प्रभाग १० मध्ये अनुभवी पत्रकार रफीक घाची,तर प्रभाग ६ ब .ॲड.जय मावळे, प्रभाग ४ ब समर्थ मल्हारी, प्रभाग १३ मध्ये प्रेम सागर पवार, प्रभाग ९ मध्ये नरेश दुबळा हे प्रबळ दावेदार असल्याची चर्चा मतदारांन मध्ये आहे.

काँग्रेसकडून प्रभागनिहाय राबविण्यात येणाऱ्या घरोघरी भेटींना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. महागाई, पाणीपुरवठा, रस्त्यांचे काम, नागरिक सुविधा अशा स्थानिक प्रश्नांवर मतदारांसोबत थेट संवाद साधत असल्यामुळे पक्षाची प्रतिमा ‘उपलब्ध आणि संपर्कात असलेला पक्ष’ अशी बनत असल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत काँग्रेसने अनुभवी नेतृत्वासोबत तरुण, उच्च शिक्षित आणि स्थानिक प्रश्नांशी जुळणारे उमेदवार मैदानात उतरवले आहेत.

यामुळे नवीन मतदार—विशेषतः प्रथमच मतदान करणाऱ्या युवा वर्गात—काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे निरीक्षण राजकीय विश्लेषकांकडून नोंदवले जात आहे.

महिला सुरक्षा, आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि अंगणवाडी-सुविधा सुधारणा यांसारख्या मुद्द्यांवर काँग्रेसच्या महिला उमेदवारांनी प्रभावी मोहीम उभारली आहे. महिलांचे गट, स्वयं-सहायता बचतगट व विविध संघटनांशी थेट संवादामुळे काँग्रेसला या गटांचा मजबूत पाठींबा मिळत असल्याचे म्हटले जाते.

डहाणूत मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे, पाणीपुरवठा तुटवडा, खराब रस्ते, बाजारपेठेतील व्यवस्थापनातील त्रुटी, रुग्णालयातील सुविधा यावर काँग्रेसने सतत भूमिका घेतली आहे. प्रत्यक्ष आकडे, मागील कामकाजाची तुलना आणि प्रभागनिहाय अडचणी मांडत काँग्रेसचे उमेदवार सध्या आक्रमक शैलीत प्रचार करत आहेत. विरोधकांच्या काही गटांमध्ये उमेदवारांची निवड, अंतर्गत मतभेद आणि उशिरा सुरू झालेला प्रचार यामुळे त्यांची संघटना अजून पूर्णपणे गती पकडताना दिसत नाही.

याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध मोहिमा राबवल्याचा त्यांना फायदा होत असल्याचे राजकीय तज्ञ मानतात. सध्या तरी प्रचारातील आघाडी, उमेदवारांची निवड आणि संघटनेचा सक्रियपणा यामुळे काँग्रेसची स्थिती मजबूत असल्याचे वातावरण आहे. तथापि, अंतिम निकालावर स्थानिक मुद्दे, प्रभागातील गठजोड, अंतिम क्षणांचा प्रचार आणि मतदारांची उपस्थिती या घटकांचा निर्णायक प्रभाव राहणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *