
पालघर | मयूर ठाकूर
पालघर नगरपरिषद निवडणूकित प्रभाग ५ मध्ये, पालघर नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती राजेंद्र पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी दोन दिवसापूर्वी बोलताना सांगितले, माझ्यावर झालेले आरोप खोटे आहेत. त्या बाबत त्यांच्याच प्रभागात आम्ही फेर फटका मारला असता, काही बाबी समोर आल्या.
नविन बनविण्यात आलेल्या वजली पाडा येथिल
- गार्डन चे चे गेट तुटलेले दिसलें
- डीपी रोड बनवला त्या वरील गटाराचे झाकणे नव्हती
- गटारावरील झाकणे तुटलेल्या अवस्तेत होती
- तसेच गार्डन च्या सुरक्षा रक्षक कॅबिन च्या काचा फोडलेल्या अवस्थेत होत्या
- गार्डन च्या शेजारील गटारावर कचऱ्याचे साम्राज्य होते
- गार्डन मध्ये दिवाबत्ती ची सोय नव्हती
- रस्ते खाली वर होऊन गाडी चालवताना समुद्रात बोट चालवण्याचा अनुभव देत होता