
डहाणू | सन्नान शेख
डहाणू नगरपरिषद निवडणुकीची तापलेली रणभूमी आता शिगेला पोहोचत असताना प्रभाग क्रमांक १० मधील स्पर्धा अधिकच रंगतदार होत आहे. यामध्ये काँग्रेसचे अनुभवी, समाजाभिमुख आणि सरळ स्वभावासाठी ओळखले जाणारे पत्रकार रफीक घाची यांची उमेदवारी विशेष चर्चेत आली आहे. स्थानिक प्रश्नांची सखोल माहिती, काम करण्याची तयारी आणि वर्षानुवर्षे जनसंपर्कातून मिळवलेला विश्वास यांच्या जोरावर घाची प्रभाग १० मध्ये मजबूत दावेदार म्हणून उदयास येत आहेत.
रफीक घाची हे गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी डहाणू शहरातील अनेक प्रश्नांवर आवाज उठवला आहे. नागरिकांची छोटी–मोठी समस्या त्यांनी केवळ ऐकून घेतली नाही, तर संबंधित विभागांमार्फत त्यावर योग्य तो न्याय मिळवून देण्याचे कामही केले. त्यामुळे “आपली समस्या रफीक भाईंकडे गेली की सोडवलीच जाते” असा जनमानसात विश्वास निर्माण झाला आहे. हा विश्वास आज निवडणुकीत त्यांच्यासाठी सर्वात मोठी ताकद ठरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
प्रभाग १० मधील घराघरात भेटी देताना रफीक घाची यांना मोठा उत्साह, सन्मान आणि पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांची साधेपणा, नेहमी उपलब्ध राहण्याची वृत्ती, आणि कोणत्याही समाजघटकाशी भेदभाव न करता काम करण्याचा स्वभाव यामुळे मतदार त्यांच्यावर अधिक भरोसा दाखवत आहेत.
जनतेमध्ये असा ठाम समज पसरलेला दिसतो की—“रफीक घाची निवडून आले तर आपल्या प्रभागातील आवाज नगरपरिषदेत जोरात पोहोचेल.” काँग्रेस पक्षाने प्रभाग १० साठी सामाजिक क्षेत्रात कामाचा मोठा अनुभव असलेला उमेदवार निवडल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आहे. स्थानिक प्रश्नांवर सविस्तर समज, प्रशासनाशी संवाद कौशल्य आणि जनतेशी असलेली जवळीक यामुळे घाचींची उमेदवारी पक्षासाठीही फायदेशीर ठरत आहे.
दररोज जनसंपर्क, लहान बैठका, नागरिकांशी थेट संवाद, महिलांचे प्रश्न, तरुणांच्या मागण्या, तसेच प्रभागातील मूलभूत सुविधांचा आढावा… या सर्व गोष्टींमुळे त्यांची निवडणूक मोहीम इतरांच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरत असल्याचे चित्र उमटत आहे.
शहरातील जाणकारांनी देखील घाची हे प्रभाग १० मधील सर्वाधिक चर्चेत असलेले उमेदवार असल्याचे नमूद केले आहे.
निवडणूक निकाल काहीही असो, प्रभाग १० मध्ये काँग्रेसचे रफीक घाची हे मतदारांच्या चर्चेचा आणि आकांक्षेचा केंद्रबिंदू बनले आहेत. त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि प्राप्त होत असलेल्या पाठिंब्यामुळे त्यांच्या बाजूचा कौल सध्या जरा जास्त असल्याचे राजकीय वातावरणातून स्पष्टपणे जाणवत आहे.