
पालघर | मयूर ठाकूर
पालघर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी एकूण सहा उमेदवार मैदानात आहेत. मात्र या सहा जणांपैकी एक नाव ‘क्लीन चेहरा’ म्हणून विशेष ठळकपणे समोर येत आहे—प्रितम राऊत.
या निवडणुकीत पाच उमेदवार हे पूर्वी कधी ना कधी पालघर नगरपरिषदेचे सदस्य राहिलेले आहेत. अनेकांनी पदे भूषवली, तर काहींनी एकाच सत्ताधारी गटात काम केल्यानंतर राजकीय समीकरणांनुसार पक्षांतराचे मार्ग निवडले. एक उमेदवार भाजपात गेले,दोन जण शिवसेनेच्या फुटीनंतर वेगवेगळ्या गटात स्थिरावले.
राजकीय निष्ठा बदललेल्या या उमेदवारांमध्ये पक्षांतर, सत्ता समीकरणे आणि गटबाजी या गोष्टी सातत्याने दिसून आल्या आहेत. यामध्ये प्रितम राऊत ही एक वेगळी ओळख जपणारी व्यक्ती.
पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले प्रितम राऊत सध्या महाआघाडीतील काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत.
तथापि ते स्पष्टपणे सांगतात की,“मला पक्ष म्हणून नाही, तर माणूस म्हणून मत द्या.” ही साधी पण ठाम भूमिका मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे. प्रितम राऊत यांची ओळख ‘क्लीन फेस’ म्हणून का आहे? कारण—शिक्षणाने अभियंता,नंतर कायदा शाखेचे अभ्यासक व वकील,स्वतःच्या कष्टाने उभे केलेला व्यवसाय,आणि वर्षानुवर्षे चालू असलेली सामाजिक बांधिलकी.
त्यांच्यावर भ्रष्टाचार, विकासकामांतील अनियमितता किंवा सत्तेचा गैरवापर यांचे कोणतेही आरोप नाहीत. शिवाय त्यांनी राजकारणाच्या पुढे जाऊन समाजकारणाला प्राधान्य दिल्याची छाप स्थानिक पातळीवर स्पष्ट आहे.
इतर उमेदवार जिथे अनेक वर्षे नगरपरिषदेत राहूनही वाद, पक्षांतरे आणि गटबाजी यांतून गेले, तिथे प्रितम राऊत यांनीभ्रष्टाचारापासून दूर राहणे,शैक्षणिक व व्यावसायिक पार्श्वभूमी,आणि व्यक्तिगत वर्तणूकयातून स्वतःची स्वच्छ, पारदर्शक आणि जनसामान्यांशी जोडलेली प्रतिमा जपली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी या वेळची लढत जरी तंग असली तरी प्रितम राऊत हे ‘क्लीन फेस’ म्हणून मतदारांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहेत.त्यांची ओळख ही पक्षाच्या पलिकडची—एक शांत, शिस्तबद्ध, अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार अशी आहे.पालघरमधील मतदार कोणत्या चेहऱ्यावर विश्वास ठेवतात याचा निर्णय 3 डिसेंबरला स्पष्ट होणार असला, तरी सध्या मात्र स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवारांमध्ये प्रितम राऊत सर्वात पुढे असल्याची चर्चेला पालघरमध्ये जोर चढला आहे.