
पालघर | मयूर ठाकूर
पालघर जिल्ह्यात होऊ घातलेल्या चार नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात धनवर्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून,काही प्रभागात आठ दिवसापासून “कोणाच्या घरात किती मतदार, कोणाची किती मते…?” याची माहिती कार्यकर्त्यांन कडून नेत्यांना पुरवायला सुरुवात झाली आहे. अशी माहिती सूत्रांच्या आधारे मिळाली आहे.एकेका मताला ५००₹ ते ३००० ₹ रुपये भाव देण्यात येत असल्याचे समजते. त्यामुळे जिल्ह्यातील एक नगरपंचायत आणि तीन नगरपरिषदा मध्ये मोठ्या प्रमाणावर धनवर्षा होणार आहे.
