
पालघर | प्रतिनिधी
पालघर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्र. १३ मध्ये शिंदेचे शिलेदार असलेले विद्यमान नगरसेवक यांना प्रचाराची गरज नसून, त्यांचे कामच बोलते अशी प्रतिक्रिया प्रभागातील मतदारांनी आमच्या प्रतिनिधी बोलताना दिली आहे.
१३ नंबर प्रभागात शिंदेचे शिलेदार असलेले २०१९ च्या निवडणुकीत जॉईन किलर ठरलेल्या चंद्रशेखर वडे उर्फ सर्वांचे लाडके बंड्या वडे यांनी आपल्या प्रभागात कामाचा तडखा लावलेला होता.
जी कामे नगरपरिषदेच्या बाकीच्या प्रभागात झाली नाहीत ती कामे त्यांनी १३ नंबर प्रभागात पूर्ण झालेली आहेत. सोलर दिवे असो की जेष्ठ नागरिकांना बेंच बसवणे असो,शाळेतील विध्यार्थ्यांना दत्तक घेणे असो, किंवा प्रभागातील आजारी जेष्ठ नागरिकांना डॉक्टरांना घेऊन घरीच उपचार करणे असो,या सर्व कामाच्या जोरावर त्यांचे कामच बोलते…!
