कॅप्टन सत्यम ठाकूर…

डहाणू | सन्नान शेख
डहाणूत नगरपरिषद निवडणुकी साठी काँग्रेस चे सहा उमेदवार रिंगणात असून,अनुभवी उमेदवारांन सोबत तरुण आणि उच्च शिक्षित उमेदवार ही या वेळी रिंगणात उतरवण्यात आले आहेत.गेले दोन टर्म नगरसेवक राहिलेले अनुभवी संतोष मोरे हे १ ब वार्डातून,तर १० नंबर वार्डातून आपल्या लेखणीतून जनतेला न्याय मिळवून देणारे पत्रकार रफीक घाची ह्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.हाफिजूल रेहमान खान यांना नगराध्यक्ष पदा साठी उमेदवारी देण्यात आलेली असून, या अनुभवी उमेदवारांन सोबत ऍड जय मावळे, समर्थ मल्हारी, सागर पवार यांच्या सारखी शिक्षित युवा उमेदवार सुद्धा डहाणू नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस तर्फे उतरविण्यात आले आहेत. या वेळी काँग्रेस पक्षाने डहाणू नगरपरिषदेची जबाबदारी राहुल गांधींचे अत्यंत विश्वासू आणि भारत यात्री कॅप्टन सत्यम ठाकूर यांच्यावर देण्यात आलेली आहे. सत्यम ठाकूर यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डहाणूत सुधारणा आणि हुकूमशाही विरोधात नक्की विजयी होतील अशी आशा व्यक्त केली आहे.

