
पालघर / मयूर ठाकूर
पालघर शहरातील समाज सेवक,माऊली प्रतिष्ठान चा अध्यक्ष ते भाजपा नगरसेवक उमेदवार नैवेद्य संखे…! २०१९ ला पालघर नगरपरिषद निवडणुकीच्या वेळी रवींद्र चव्हानांनी नैवेद्य ला शब्द दिला होता, या वेळी माघार घे पुढच्या वेळी मी तुला संधी देईल, त्यांनी तो शब्द पाळला. पण एकनाथ शिंदे शब्द पाळण्यात अयशस्वी ठरले.

शिंदेच्या युवा सेनेचा जिल्हा समन्व्यक असलेला नैवेद्य संखे माऊली प्रतिष्ठान च्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.शहरातील समस्या साठी पुढे येणार तरुण तडफदार समाजसेवक म्हणूनही नावारूपाला आला आहे. शहरात समाजकार्य करणारा नैवेद्य ग्रामीण आदिवासी भागात सुद्धा तेवढाच कार्य तत्पर आहे. वनई सुकतआंबा सारख्या ग्रामीण भागात त्याचे सामाजिक कार्य म्हणजे गरीब विध्यार्थी शैक्षणिक आणि जेष्ठ नागरिक यांना आरोग्य विषयक मदत करणे. या सारखे कामे करणे.या प्रभागातील नागरिकांचे म्हणने आहे की आम्हाला नगरसेवक हवा, नगरशेठ नको…?

