मस्तान नाका उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्याने प्रशासनाला जाग…?प

Spread the love

पालघर | प्रतिनिधी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाका उड्डाणपुलाचा काही भाग एका मोठ्या अवजड क्रेन चा धक्का लागल्याने कोसळला असून या घटनेमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

या अपघाता मुळे प्रशासनाला जाग आलेली असून एन एच ए आई, फिश मॅन प्रभू कॅन्सलटिंग, आणि महामार्ग ऍक्टिविष्ट यांची तातडीची बैठक मनोर पोलीस प्रभारी यांच्या दालनात पार पडली. या बैठकीत महामार्गांवरील अनेक समस्या बाबत सविस्तर चर्चा करून ठोस पावले उचलण्यात येणार असल्या बाबत एन एच ए आई चे टेक. मॅनेजर दीपेन राठोड यांनी सांगितले.

मस्तान नाका उड्डाणपुलावर अलीकडेच सिमेंट काँक्रीटचे काम करण्यात आले होते. या कामामुळे पुलावरील कथड्यांची उंची कमी झाली होती, त्यात मोठ्या वाहनांच्या हालचाली दरम्यान पुलावर ताण निर्माण होत होता.

याच पुलावर काही महिन्यांपूर्वी एक केमिकल टँकर खाली कोसळण्याची घटना घडली होती. त्या वेळीच या पुलाचे सेफ्टी ऑडिट तातडीने करण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या निष्क्रीय भूमिकेमुळे हे ऑडिट अद्याप झालेले नाही.

स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी या घटनेनंतर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, NHAI अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला होता. नागरिकांची मागणी आहे की, पुलाचे त्वरित ऑडिट करण्यात यावे, तसेच दुरुस्ती आणि संपूर्ण संरचनात्मक तपासणी करण्यात यावी. हायवे ऍक्टिविस्ट च्या या मागण्या मनोर पोलीस ठाणे प्रभारीनच्या अध्यक्षते खाली झालेल्या बैठकीत एन एच ए आई तर्फे दिपेन राठोड यांनी मान्य केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *