
पालघर | मयूर ठाकूर
पालघर नगरपरिषद निवडणुकीची घोषणा होताच स्थानिक राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.
सत्ताधारी विरुद्ध नव्या उमेदवारांची टक्करगेल्या पाच वर्षांपासून नगरपरिषदेवर सत्ताधारी गटाचे वर्चस्व असून, शहरातील विकासकामांबाबत जनतेत मिश्र प्रतिक्रिया दिसून येत आहे. काही ठिकाणी रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या कामांच्या कंत्रातात सुधारणा झाली असली तरी अनेक प्रभागांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव अजूनही जाणवतो. त्यामुळे जनतेत नाराजीचे वातावरण आहे.
दरम्यान, विरोधी पक्ष तसेच स्थानिक नव्या सामाजिक संघटनाही या वेळी नगरपरिषदेच्या निवडणुकीत जोरदार तयारी करताना दिसत आहेत. या वेळी काही स्थानिकांनी स्वतंत्र उमेदवार देण्याचे संकेत दिले आहेत.

प्रभाग पातळीवर उमेदवारांची चाचपणीसध्या सर्वच पक्षांनी आपापल्या प्रभागांतील कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. प्रमुख राजकीय पक्षांकडून सर्वेक्षण करून जनमताचा अंदाज घेतला जात आहे. शहरात मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले असून, मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेक जुन्या चेहऱ्यांना यंदा पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.जनतेच्या अपेक्षापालघर शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरवस्था, ट्रॅफिक तसेच पाणीटंचाई यासारख्या समस्या अधिक गंभीर बनल्या आहेत. नागरिकांचा स्पष्ट सूर आहे की, “विकासावर बोलणाऱ्यांनाच मत देऊ”. त्यामुळे या निवडणुकीत लोकवर्गीय प्रश्न आणि नागरी सुविधा हा मुद्दा निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.
महिला व युवा उमेदवारांचा प्रभावया वेळी महिलांना आणि तरुणांना पक्षांकडून अधिक संधी देण्याची मागणी होत आहे. काही प्रभागांमध्ये तरुण कार्यकर्त्यांनी स्वतंत्र पॅनल तयार केले असून, नव्या नेतृत्वाची चुणूक दिसत आहे.
राजकीय समीकरणांची नव्याने मांडणीराज्यातील बदलत्या राजकीय वातावरणाचा परिणाम पालघरमध्येही दिसत आहे. राज्यातील युती व आघाडी पक्षांतील बदललेली समीकरणे स्थानिक स्तरावर उमेदवार निवडीवर थेट परिणाम करतील. त्यामुळे पालघरची ही निवडणूक केवळ नगरपातळीवरची न राहता — राजकीय भविष्यासाठी दिशा दाखवणारी ठरणार आहे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
मतदारांचा मूड स्पष्ट आहे — “काम पाहू, वचन नव्हे“.
मतदारसंख्या बदल आणि नव्या उमेदवारांनी धावा घालणे ही निवडणूक अधिक खुली आणि प्रतिस्पर्धात्मक करतील.
१५ प्रभागांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीत मतदारसंख्येतील बदल, उमेदवारांची लढत आणि सामाजिक-भौगोलिक समीकरणांचे महत्व अधिकच वाढले आहे. जनतेकडून विकास आणि कामाची अपेक्षा स्पष्ट दिसते.
मतदार यादीत २२९० हून अधिक बदल झाले असून, १० प्रभागांत १०० पेक्षा जास्त मतदारसंख्येतील बदल नोंदले गेले आहेत. एकूण मतदारसंख्या अंदाजे ५५,७२७ असून, पुरुष २९,२८२ व महिला २६,४४३ इतकी आहेत. शहरातील महत्वाच्या जागांवर पक्षांमधील झडप आणि उमेदवार बदललेले दिसत आहेत.
उमेदवार निवडीत महिलांना व नवतरुणांना जास्त संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.विकास, पाणी-रस्ता-स्वच्छतेचा मुद्दा वाढत्या प्रमाणात ठरत आहे.
प्रमुख उमेदवार प्रोफाइल्स (पक्षानुसार)
भाजपा (Bharatiya Janata Party)प्रशांत पाटील – भाजपाचे राज्यस्तरीय नेते; ओबीसी सेलमध्ये सक्रिय कार्यकर्ता, भाजपमध्ये उमेदवारीसाठी नाव चर्चेत आहे. ब्लू-प्रिंट: शहरी भागावर अधिक लक्ष, विकासकामे दाखवून मतदारांचे समर्थन.यंदाच्या नगरपरिषदेत भाजपकडून नगराध्यक्षा पदासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. कैलास म्हात्रे, माजी नगरसेवक भाजपचा नवा चेहरा बनण्या साठी उत्सुक असून, काही उपद्रवी लोकांना साथ….? म्हणून पक्ष श्रेष्टी यांच्या निर्णया वर लक्ष.
शिवसेना (शिंदे गट)उत्तम घरत – माजी नगरसेवक/ उपनगराध्यक्ष, पक्षवाटपानंतर शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारीस उत्सुक.
केदार काळे – शहरातील ठराविक मतदारांमध्ये लोकप्रियतेचा संच ठेवणारा उम्मेदवार.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)असलम मणियार – शहरातील सामाजिक कामात सक्रिय, NCP कडून उमेदवारीची चर्चेत. ब्लू-प्रिंट: आदिवासी वर्ग आणि ग्रामीण भागात पकड वाढवण्याचा प्रयत्न.
काँग्रेस नितांत चव्हाण – काँग्रेसमध्ये शहरातील शिकवण व सामाजिक संघटनांमध्ये सक्रिय. निवडणुकीत उमेदवारीस लक्ष. ब्लू-प्रिंट: परंपरागत मतदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न; परंतु वरती दबाव अधिक.
