
पालघर | मयूर ठाकूर
“ADC पळा… ACB येतेय!” अशी कुजबुज अचानक पसरताच वसई RTO कार्यालय परिसरात एकच गोंधळ उडाला. एजंटांच्या/एडिसिनच्या (ADC) वर्तुळात ACB (Anti Corruption Bureau) च्या कारवाईचा इशारा मिळताच काही एजंटांनी व ADC नी तातडीने काढता पाय घेतल्याची माहिती समोर येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून परवाना, वाहन नोंदणी, ट्रान्स्फर आणि इतर कामांसाठी ‘तत्काळ सेवा’च्या नावाखाली अवैध (G फॉर्म ) वसुली होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर Anti Corruption Bureau (ACB) कारवाईसाठी येणार असल्याची खबर एजंटांच्या आणि RTO अधिकारी यांच्या गोटात पसरली. त्यानंतर कार्यालया बाहेर आणि आत बसलेल्या काही एजंटांनी,ADC नी तात्काळ ठिकाण सोडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
एजंटांची धावाधाव, नागरिक हैराण
घडलेल्या प्रकारामुळे RTO कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. काही जणांनी सांगितले की, “नेहमीप्रमाणे एजंट ऑफिस परिसरात सक्रिय होते; मात्र अचानक फोनवरून ‘ACB येतेय ’ असा इशारा मिळताच अनेक जण दिसेनासे झाले.
”अधिकृत पुष्टीची प्रतीक्षा
या घटनेबाबत अधिकृत स्तरावरून कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही. प्रत्यक्षात ACB ची छापेमारी होती की केवळ अफवा, याबाबत अद्याप संभ्रम आहे. मात्र या घटनेमुळे RTO मधील एजंटराज आणि संभाव्य गैरव्यवहारांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पारदर्शकतेची मागणी
नागरिकांनी RTO कार्यालयातील कामकाज पूर्णपणे ऑनलाइन व पारदर्शक करण्याची मागणी केली आहे. “जर सर्व प्रक्रिया नियमांनुसार होत असतील, तर ACB च्या नावाने घाबरण्याचे कारण काय?” असा सवालही काहींनी उपस्थित केला.सदर प्रकरणाची सखोल चौकशी होऊन वस्तुस्थिती जनतेसमोर यावी, अशी मागणी होत आहे. प्रशासनाकडून अधिकृत खुलासा झाल्यानंतरच नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.या बाबत वसई RTO च्या वरिष्ठ अधिकार्यांना त्यांच्या भ्रमण ध्वनी वरुण प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.. त्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे की हे वरिष्ठ अधिकारी देखील नक्कीच काही गोष्टी झाकून ठेवण्याचा प्रयत्न करीत असावे वा काही गोष्टींची सावरासावर करीत असावे…?