
पालघर | मयूर ठाकूर
पालघर नगरपरिषद निवडणूक २०२५ नगराध्यक्ष पदासाठी उभे उमेदवारांन पैकी सहा उमेदवार रिंगणात असून खरी लढत शिवसेना शिंदे गटाचे उत्तम घरत, भाजपचे कैलास म्हात्रे, काँग्रेस चे प्रितम राऊत यांच्यात होणार आहे.
बाकी फक्त डिपॉसित जप्त करण्यासाठी उभे असल्याचे नागरिकांन मध्ये बोलले जात आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला साठी राखीव असलेला प्रभाग क्र. १ अ मध्ये नगरसेवक पदा साठी चार उमेदवार रिंगणात असून, खरी लढत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तथा माजी नगरसेविका प्रियांका म्हात्रे आणि भाजपच्या विदिशा माळी यांच्यात होणार आहे. त्यात ही विद्यामन असलेल्या नगरसेविका प्रियांका म्हात्रे विजयी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे.
सर्वसाधारण प्रभाग क्र. १ ब मध्ये नगरसेवक पदा साठी चार उमेदवार रिंगणात असून, खरी लढत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र (बंड्या ) म्हात्रे तसेच भाजपाचे राज धोत्रे आणि उबाठा चे आरिफ कलाडिया यांच्यात होणार असून काँग्रेस चे अफसर शेख कोणाची मते खाणार ते पाहणे गरजेचे आहे,या प्रभागावर अनेक टर्म रविंद्र म्हात्रे यांचे वर्चस्व राहिलेले असून, प्रभागातील प्रत्येक घरात त्यांचे सळोख्याचे संबंध आहेत, त्या मुळे त्यांचा विजय सुखकर मानला जात आहे.
अनुसूचित जमाती साठी राखीव प्रभाग क्र. २ अ मध्ये नगरसेवक पदा साठी सहा उमेदवार रिंगणात असून, खरी लढत भाजपच्या मोना मिश्रा आणि शिवसेना शिंदे गटाचे महेश धोडी आणि काँग्रेस चे मनोहर दांडेकर यांच्यात होणार असून, या तिघांत कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे होणार आहे.
सर्वसाधारण महिला साठी राखीव प्रभाग क्र. २ ब मध्ये नगरसेवक पदा साठी तीन उमेदवार रिंगणात असून, या तिघांत सरळ लढत असून उबाठा गटाच्या उच्चं शिक्षित ऍड. प्रीती भानुशाली, शिंदेच्या बिंदिया दीक्षित तर बीजेपीच्या भारती धोत्रे या सर्व उमेदवार तोडीस तोड असून, काटेकी टक्कर या प्रभागात पाहवयास मिळणार आहे.
अनुसूचित जमातीसाठी राखीव प्रभाग क्र. ३ अ मध्ये नगरसेवक पदा साठी चार उमेदवार रिंगणात असून, खरी लढत शिंदेचे महेश कोती आणि भाजपाचे मंगेश मरले यांच्यात होणार आहे.यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
सर्वसाधारण महिला साठी राखीव असलेलाप्रभाग क्र. ३ ब मध्ये नगरसेवक पदा साठी चार उमेदवार रिंगणात असून, खरी लढत शिंदेच्या मोनिका गवळी आणि माजी नगरसेवक प्रविण मोरे यांच्या पत्नी कृपा मोरे, तसेच कामिनी रानडे यांच्यात आहे.यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
अनुसूचित जाती साठी राखीव प्रभाग क्र. ४अ मध्ये नगरसेवक पदा साठी चार उमेदवार रिंगणात असून, खरी लढत भाजपाचे विकास गायकवाड, उबाठा गटाचे राजेश गायकवाड आणि अपक्ष निखिल गायकवाड यांच्या तिरंगी लढत होईल.यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
सर्व साधारण महिलांन साठी राखीव असलेला प्रभाग क्र. ४ ब मध्ये नगरसेवक पदा साठी तीन उमेदवार रिंगणात असून, खरी लढत नुकताच भाजपच्या मध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका हिंदवी पाटील आणि शिंदे गटाच्या प्रिती मोरे तसेच उबाठा च्या पूनम सांगळे यांच्यात होईल.यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्गा साठी राखीव असलेल्या प्रभाग क्र. ५ अ मध्ये नगरसेवक पदा साठी तीन उमेदवार रिंगणात असून, खरी लढत भाजपचे नैवेद्य संखे आणि शिंदे सेनेच्या राजेंद्र पाटील या दोघांत आहे, उबाठाचे शिरीष संखे कोणाची मते खाणार ते पाहणे गरजेचे आहे.
सर्वसाधारण महिला साठी राखीव प्रभाग क्र. ५ ब मध्ये नगरसेवक पदा साठी तीन उमेदवार रिंगणात असून, खरी लढत ही शिंदे सेनेच्या पुष्पा जैन आणि भाजपाच्या विद्यमान नगरसेविका अलका राजपूत यांच्यात होईल,यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग साठी राखीव प्रभाग क्र. ६ अ मध्ये नगरसेवक पदा साठी तीन उमेदवार रिंगणात असून, खरी लढत भाजपच्या प्रगती म्हात्रे आणि शिंदे सेनेच्या सुचिता घरत तर उबाठा च्या सपना गावडे यांच्यात होईल.यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
सर्वसाधारण साठी राखीव प्रभाग क्र. ६ ब मध्ये नगरसेवक पदा साठी चार उमेदवार रिंगणात असून, खरी लढत ही भाजपाचे ललित जैन आणि शिंदे सेनेचे रईस खान तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मनकवल सिंग चढढा यांच्यात होईल.यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
अनुसूचित जमाती महिला साठी राखीव प्रभाग क्र. ७ अ मध्ये नगरसेवक पदा साठी चार उमेदवार रिंगणात असून, खरी लढत ही भाजपच्या माजी नगरसेवक यांच्या भगिनी मयुरी ठाकूर आणि राष्ट्रवादी( अ प) गटाच्या सृष्टी काटेला आणि शिंदे गटाच्या ज्योती जाधव तसेच काँग्रेस च्या मानसी दांडेकर यांच्यात होईल.यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
सर्वसाधारण साठी राखीव प्रभाग क्र. ७ ब मध्ये नगरसेवक पदा साठी पाच उमेदवार रिंगणात असून, खरी लढतशिंदे सेनेचे तरुण तडफदार उमेदवार आफताब खान आणि भाजपाचे मुरलेले राजकारणी मुनाफ मेमन यांच्यात होईल.यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
सर्वसाधारण महिला साठी राखीव प्रभाग क्र. ८अ मध्ये नगरसेवक पदा साठी तीन उमेदवार रिंगणात असून, खरी लढत माजी नगराध्यक्ष प्रियांका पाटील आणि माजी नगरसेविका राधा मानकामे आणि शशी पाटील यांच्यात होईल.यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
सर्वसाधारण साठी राखीव प्रभाग क्र. ८ ब मध्ये नगरसेवक पदा साठी चार उमेदवार रिंगणात असून, खरी लढत शिंदे सेनेचे सुभाष पाटील आणि उबाठा गटाचे राहुल पाटील यांच्यात होईल.यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
हा प्रभाग नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांना राखीव असून,प्रभाग क्र. ९अ मध्ये नगरसेवक पदा साठी तीन उमेदवार रिंगणात असून, खरी लढत शिंदे सेनेच्या मेघा आघाव भाजपाच्या रेशमा पाटील, आणि उबाठा च्या चेतना मोरे यांच्यात होईल.यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
सर्वसाधारण साठी राखीव प्रभाग क्र. ९ ब मध्ये नगरसेवक पदा साठी चार उमेदवार रिंगणात असून, खरी लढत ही भाजपाचे करण तिवारी आणि काँग्रेस चे तुषार पाटील आणि शिंदे सेनेचे अमोल पाटील यांच्यात होईल.यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
सर्वसाधारण महिला साठी राखीव असलेला प्रभाग क्र. १०अ मध्ये नगरसेवक पदा साठी तीन उमेदवार रिंगणात असून, खरी लढत शिंदे सेनेच्या विभूती चंपानेरकर, राष्ट्रवादी (श प )गटाच्या श्रिया पाटील आणि भाजपच्या गीता पिंपळे यांच्यात होईल.यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
सर्वसाधारण साठी राखीव प्रभाग क्र. १० ब मध्ये नगरसेवक पदा साठी चार उमेदवार रिंगणात असून, खरी लढत शिंदे सेनेचे निलम संखे तसेच भाजपाचे माजी नगरसेवक अक्षय संखे आणि मनसे प्रणित अपक्ष निशांत धोत्रे यांच्यात आहे.यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला साठी राखीव प्रभाग क्र. ११अ मध्ये नगरसेवक पदा साठी चार उमेदवार रिंगणात असून, खरी लढतभाजपच्या सोनाली शिंदे आणि शिंदे सेनेच्या प्रणाली पाटील यांच्यात आहे.यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
सर्वसाधारण साठी राखीव प्रभाग क्र. ११ब मध्ये नगरसेवक पदा साठी चार उमेदवार रिंगणात असून, खरी लढतभाजपाचे विद्यमान नगरसेवक भावांनंद संखे, शिंदे सेनेचे शशिकांत किणी आणि उबाठाचे सुनिल महेंद्रकर यांच्यात आहे.यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्गा साठी राखीव प्रभाग क्र. १२अ मध्ये नगरसेवक पदा साठी पाच उमेदवार रिंगणात असून, खरी लढत भाजपाचे अमिष पिंपळे आणि उबाठा चे विद्यमान नगरसेवक प्रथमेश पिंपळे यांच्यात आहे.यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
सर्वसाधारण महिला साठी राखीव प्रभाग क्र. १२ ब मध्ये नगरसेवक पदा साठी चार उमेदवार रिंगणात असून, खरी लढत शिंदे सेनेच्या माजी नगराध्यक्ष उज्वला काळे आणि अंजली पाटील, तसेच उभाठाच्या अनुजा तरे, आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राधा चौधरी यांच्यात आहे. यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी राखीव प्रभाग क्र. १३अ मध्ये नगरसेवक पदा साठी पाच उमेदवार रिंगणात असून, खरी लढत शिंदे सेनेचे चंद्रशेखर वडे, आणि माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, आणि भाजपाचे कृतार्थ पाटील, आणि मनसे पुरस्कृत अपक्ष हिमांशू राऊत यांच्यात आहे.यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
सर्वसाधारण महिला साठी राखीव प्रभाग क्र. १३ब मध्ये नगरसेवक पदा साठी चार उमेदवार रिंगणात असून, खरी लढत भाजपाचे संध्या दीक्षित, शिंदेच्या शिल्पा बाजपेई यांच्यात आहे.यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्गा साठी राखीव प्रभाग क्र. १४अ मध्ये नगरसेवक पदा साठी तीन उमेदवार रिंगणात असून, खरी लढत भाजपच्या भाग्यराज पाटील आणि शिंदेचे दिनेश घरत यांच्यात आहे.यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
सर्वसाधारण महिला साठी राखीव प्रभाग क्र. १४ब मध्ये नगरसेवक पदा साठी चार उमेदवार रिंगणात असून, खरी लढत भाजपच्या विद्यमान नगरसेविका रोहिणी अंबुरे, शिंदेच्या गीतांजली माने, उभाठाच्या हेमांगी भगत आणि अपक्ष वर्षा माळी यांच्यात आहे.यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
अनुसूचित जमाती महिला साठी राखीव प्रभाग क्र.१५अ मध्ये नगरसेवक पदा साठी तीन उमेदवार रिंगणात असून, खरी लढत भाजपच्या पूनम राठोड शिंदेच्या माधुरी सापते, उबाठाच्या प्रिती मेढे यांच्यात आहे.यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे.
सर्वसाधारण साठी राखीव प्रभाग क्र. १५ब मध्ये नगरसेवक पदा साठी पाच उमेदवार रिंगणात असून, खरी लढत भाजपचे गौतम गायकवाड आणि शिंदेचे जाश्विन घरत आणि काँग्रेस च्या सानिक चव्हाण यांच्यात आहे.
यांच्यात कोण बाजी मारते ते पाहणे गरजेचे आहे. तसेच कोणाची सत्ता येते आणि कोणाची सत्ता जाईल, हे ३ डिसेंबर ला कळेल या कडे शहर वासियांचे लक्ष लागले आहे.