
पालघर / हंसराज पाटील
पालघर : पालघर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी शाम मधुमकर यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर नगर परिषद निवडणूक 2 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे, तर मतमोजणी 3 डिसेंबर 2025 रोजी पार पडणार आहे.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार असून, 17 नोव्हेंबर 2025 ही अर्ज भरण्याची शेवटची दिनांक असेल.
या घोषणेनंतर पालघर शहरात निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. विविध राजकीय पक्षांनी प्रचार मोहीम सुरू करण्याच्या तयारीला वेग दिला आहे.