
पालघर | प्रतिनिधी
पालघर शहरातील नाकोडा ज्वेलर्समध्ये घडलेल्या 3 कोटी 72 लाखांच्या दरोड्याचा फक्त 48 तासांत उलगडा करत पालघर पोलिसांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. गुन्ह्यातील 5 आरोपींना अटक करत त्यांच्याकडून 3 कोटी 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
मुख्य मुद्दे —
- दरोडा 8 नोव्हेंबरच्या रात्री घडला
- शेजारच्या दुकानातून भिंत फोडून आत प्रवेश
- गॅस कटरने तिजोरी कापून सोन्या–चांदीची चोरी
- घटनेनंतर तक्रारदार पियुष जैन यांनी पोलिसांकडे धावसी
- सीटीव्हीतून वॉचमन दीपक सिंग व नरेश गुन्ह्यात सामील असल्याचे स्पष्ट
- तपासात आरोपी नेपाळचे नागरिक असल्याचे उघड
- पोलिसांचे पथक गुजरात व यूपी सीमेजवळ रवाना
- सीमा तपासात 4 आरोपी पकडले
- पाचवा आरोपी सुरतमधून अटक

या प्रकरणात पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी स्वतः लक्ष घालत त्वरित स्वतंत्र पथके स्थापन करण्याचे आदेश दिले होते. तांत्रिक तपासात आरोपी नेपाळकडे पळ काढत असल्याचे समोर आले. त्यानुसार गुजरात व यूपीतील खेरी येथे नेपाळ सीमेजवळ पथके पोहोचली व स्थानिक सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने आरोपींना जेरबंद करण्यात आले.
जप्त मुद्देमाल —
- 2222.68 ग्रॅम सोने
- 41 किलो 481 ग्रॅम चांदी
- 4,94,650 रुपये रोख
- एकूण किंमत — ₹3,28,18,450
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, पालघर पोलीस ठाणे आणि सायबर शाखेच्या संयुक्त टीमने केली. या जलद आणि अचूक कारवाईमुळे व्यापारी वर्गातून पालघर पोलिसांचे कौतुक केले जात आहे.