Blog

पालघर जिल्ह्यातील नगरपरिषद–नगरपंचायत निवडणुकीत राजकीय भूकंप

Spread the love

भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा पराभव, शिंदे गटाचा जिल्ह्यात वरचष्मा

पालघर | हंसराज पाटील

पालघर जिल्ह्यात पार पडलेल्या चार नगरपरिषद आणि एका नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर होताच जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे. या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल समोर आले असून, विशेषतः भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) यांनी पालघर नगरपरिषदेसह अनेक ठिकाणी सत्ता मिळवत जिल्ह्यात आपले वजन सिद्ध केले आहे.

■ जव्हार नगरपरिषद : भाजपची एकहाती सत्ताएकूण जागा : 20

  • भाजप – 14
  • शिवसेना (शिंदे गट) – 2
  • राष्ट्रवादी (अजित पवार) – 3
  • राष्ट्रवादी (शरद पवार) – 1

जव्हार नगरपरिषदेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा उदावंत या विजयी झाल्या असून, आदिवासी भागात भाजपची पकड अजूनही मजबूत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

■ पालघर नगरपरिषद : शिंदे गटाचा दणदणीत विजयएकूण जागा : 30

  • शिवसेना (शिंदे गट) – 19
  • भाजप – 8
  • ठाकरे गट – 3

पालघर नगरपरिषद निवडणूक ही जिल्ह्यातील सर्वात लक्षवेधी लढत ठरली. नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत शिंदे गटाचे उत्तम घरत, भाजपचे कैलास म्हात्रे आणि काँग्रेसचे प्रितम राऊत यांच्यात होती.

या लढतीत उत्तम घरत यांनी सुमारे 5 हजार मतांनी दणदणीत विजय मिळवत नगराध्यक्ष पद पटकावले. इतर उमेदवार केवळ डिपॉझिट जप्तीसाठी उभे होते, अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.या निवडणुकीत पालघर नगरपरिषदेत शिंदे गटाने बहुमत मिळवत भाजपला मोठा धक्का दिला आहे. याच नगरपरिषदेत भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा पराभव झाल्याने जिल्ह्यात भाजपच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

■ पालघर नगरपरिषद – प्रभागनिहाय ठळक निकाल (संक्षेप)अनेक प्रभागांमध्ये शिंदे गटाचे वर्चस्वकाही प्रभागांमध्ये अत्यल्प मतांच्या फरकाने विजयउबाठा गटाने काही ठिकाणी अनपेक्षित बाजी मारलीभाजपच्या अनेक विद्यमान नगरसेवकांचा पराभवविशेषतः प्रभाग क्रमांक ३अ मध्ये अवघ्या 10 मतांनी विजय, तर काही प्रभागांमध्ये स्थानिक संपर्क आणि वैयक्तिक कामगिरी निर्णायक ठरली.

■ वाडा नगरपंचायत : भाजपचा गड कायमएकूण जागा : 17

  • भाजप – 10
  • शिवसेना (शिंदे गट) – 3
  • ठाकरे गट – 1
  • राष्ट्रवादी (अजित पवार) – 1
  • राष्ट्रवादी (शरद पवार) – 1
  • काँग्रेस – 1

वाडा नगरपंचायतीत भाजपने बहुमत मिळवत सत्ता आपल्या हातात ठेवली आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रीमा गंधे या विजयी झाल्या.

■ डहाणू नगरपरिषद : भाजप बहुमत, पण नगराध्यक्ष शिंदे गटाचाएकूण जागा : 27

  • भाजप – 17
  • शिवसेना (शिंदे गट) – 2
  • राष्ट्रवादी (शरद पवार) – 8

डहाणू नगरपरिषदेत भाजपने संख्याबळ मिळवले असले तरी, राजकीय समीकरणांमुळे शिवसेना (शिंदे गट) चे राजेंद्र माच्छी हे नगराध्यक्ष पदावर विजयी झाले. हा निकालही भाजपसाठी अनपेक्षित धक्का मानला जात आहे.

■ निष्कर्ष : जिल्ह्याच्या राजकारणात मोठा बदलया निवडणुकांमधून स्पष्ट होते की —शिवसेना (शिंदे गट) पालघर जिल्ह्यात वेगाने मजबूत होत आहेभाजपला काही ठिकाणी यश मिळाले असले तरी नेतृत्वावर प्रश्नचिन्हउबाठा व राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने काही प्रभागांमध्ये आपली उपस्थिती दाखवलीआगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकांसाठी हे निकाल दिशादर्शक ठरणार आहेतपालघर जिल्ह्यातील या निकालांनी महायुती आणि विरोधक दोघांनाही आत्मपरीक्षण करायला भाग पाडले असून, पुढील राजकीय हालचालींना वेग येणार हे निश्चित आहे..