नागझरी चरी खुर्द ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात प्रजासत्ताक दिनी उपोषण

Spread the love

पालघर | प्रतिनिधी

पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील ग्रामपंचायत नागझरी चरी खुर्द येथे ग्रामपंचायत अधिकारी शिवाजी धनासुके आणि सरपंच कविता भुरकूड यांनी भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांच्या निषेधार्थ ग्रामस्थ सिद्धेश अनंत पाटील यांनी आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिल्हा परिषद कार्यालय, पालघर समोर उपोषण सुरू केले आहे.


ग्रामपंचायतीतील विकास कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार, नियमबाह्य निर्णय आणि निधीचा अपहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे.


दरम्यान, उपोषणस्थळी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी भेट देत आंदोलक सिद्धेश पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती करत प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
मात्र, यावर बोलताना सिद्धेश पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली.


“साहेब, मी तुमचा मान राखतो, पण प्रशासकीय अधिकारी आणि संबंधितांवर ठोस कारवाई झाल्याशिवाय उपोषणातून माघार घेणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.


मुख्य म्हणजे एका दैनिकाचे पत्रकार यांच्यावर अपंग असल्याचे दाखवून ₹११०००/- चा धनादेश वटविण्यात आलेला आहे. या बाबत आमच्या प्रतिनिधी ने अजून जाणून घेण्यासाठी त्या पत्रकाराशी बोलले असता, माझ्या कडे कर्मचारी भरती ची जाहिरात लावली होती, त्याचे ते बिलाचा धनादेश असल्याचे त्यांच्या कडून कळले असून, त्या बाबत बनविण्यात आलेल्या पावती वर स्वीकारण्याऱ्याची सही नसल्याने..? मोठे प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.


या घटनेमुळे जिल्हा परिषद प्रशासनावर दबाव वाढला असून, आता या प्रकरणात कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


प्रतिक्रिया /-
माझ्या वर लावण्यात आलेले आरोप हे राजकीय हेतूने पुरस्कृत असून, माझा राजकीय बळी घेण्यात येत आहे.
शिवाजी धनासुरे, ग्रामपंचायत अधिकारी.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *