
पालघर | सन्नान शेख
बदलत्या काळात माहेरच्या नात्यांतील जिव्हाळा आणि भावनिक ओढ जपणारे उपक्रम विरळ होत असताना मुरबे गावात आयोजित करण्यात आलेल्या ‘मी माहेरवाशिण मुरबे भंडारआळीची, ओढ मला माहेराची’ या स्नेहमेळाव्याने अनेक माहेरवाशिणींच्या आठवणींना उजाळा दिला. प्रेम, आपुलकी आणि गावाशी असलेलं नातं अधिक दृढ करणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
मुरबेचे भूमिपुत्र प्रकाश पाटील यांचे सुपुत्र स्वप्निल पाटील यांनी गावातील माहेरवाशिणींना त्यांच्या माहेरात एक वेगळाच आनंद अनुभवता यावा या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे, याच दिवशी प्रकाश पाटील यांचा वाढदिवस तसेच प्रकाश पाटील आणि सौ. प्रमिला पाटील यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा योग जुळून आल्याने कार्यक्रमाला अधिक भावनिक स्वरूप प्राप्त झाले.

कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रात मुरबे पीएचसीचे डॉ. सिद्धेश वाजे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापिका अनुराधा महादवी निवाळकर तसेच मुरबे गावच्या सरपंच श्रीमती मोनालिसा तरे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मान्यवरांनी महिलांच्या ऐक्याचे, माहेराशी असलेल्या नात्याचे आणि अशा उपक्रमांच्या सामाजिक महत्त्वाचे कौतुक केले.
दुपारच्या सत्रात महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. माहेरवाशिणींनी उत्स्फूर्त सहभाग घेत आनंदोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाच्या शेवटी आकर्षक लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या महिलेला सुंदर पैठणी भेट देऊन गौरविण्यात आले.
‘माहेरच्या उंबरठ्यावर पुन्हा फुलल्या आठवणी’संपूर्ण कार्यक्रमात सहभागी महिलांसाठी सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत उत्तम स्नेह भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती.
स्वप्निल पाटील आणि सुविधा पाटील रूपाली पाटील त्यांच्या कुटुंबीयांनी दिवसभर उपस्थित राहून विशेष सहकार्य केले,प्रत्येक माहेरवाशिणीच्या आनंदात सहभागी होत आपुलकीची भावना जपली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका सौ. नम्रता माळी पाटील यांनी ओघवत्या शैलीत केले. तसेच या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रूपाली पाटील यांची विशेष मदत लाभली.
माहेरच्या आठवणी, नात्यांची ऊब आणि गावाशी असलेली भावनिक बांधिलकी यांचा सुंदर मिलाफ घडवून आणणारा हा स्नेहमेळावा मुरबे गावासाठी संस्मरणीय ठरला.
आणि कौटुंबिक स्वरूप प्राप्त झाले.कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रात मुरबे पीएचसीचे डॉ. सिद्धेश वाजे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापिका अनुराधा महादवी निवाळकर तसेच मुरबे गावच्या सरपंच श्रीमती मोनालिसा तरे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मान्यवरांनी महिलांच्या ऐक्याचे, माहेराशी असलेल्या नात्याचे आणि अशा उपक्रमांच्या सामाजिक महत्त्वाचे कौतुक केले.
दुपारच्या सत्रात महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. माहेरवाशिणींनी उत्स्फूर्त सहभाग घेत आनंदोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाच्या शेवटी आकर्षक लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या महिलेला सुंदर पैठणी भेट देऊन गौरविण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमात सहभागी महिलांसाठी सकाळच्या नाश्त्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत उत्तम स्नेह भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती.