गुड सेमेरिटन 108 ऍपचे वाहतूक शाखेच्या पोलिसांना प्रशिक्षण

Spread the love

पालघर / प्रतिनिधी

पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आज बीव्हीजी (BVG) कंपनीतर्फे विकसित करण्यात आलेल्या ‘Good Samaritan 108’ या आपत्कालीन सेवा ऍपबाबत विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रुग्णांना वेळेत मदत मिळावी आणि अपघातग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी नागरिक तसेच पोलीस यंत्रणा अधिक प्रभावीपणे काम करू शकतील, या उद्देशाने हे प्रशिक्षण घेण्यात आले.

कार्यक्रमात डॉ. मंगेश चव्हाण, अमित वाडे आणि लक्ष्मण जाधव यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ऍपच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ‘Good Samaritan 108’ या ऍपच्या माध्यमातून अपघात किंवा इतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळवणे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.या ऍपची खास वैशिष्ट्ये समजावून सांगताना घटनास्थळाचे फोटो व व्हिडिओ थेट अपलोड करून रुग्णाची स्थिती संबंधित वैद्यकीय यंत्रणांपर्यंत पोहोचवता येते, असे सांगण्यात आले. त्यामुळे रुग्णवाहिका, डॉक्टर आणि आपत्कालीन सेवा तत्काळ घटनास्थळी पोहोचण्यास मदत होते. अपघातग्रस्तांना “गुड सेमेरिटन” म्हणून मदत करणाऱ्या नागरिकांना कायदेशीर संरक्षण देखील उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

अधिकाऱ्यांनी नागरिकांनी या ऍपचा जास्तीत जास्त वापर करून अपघातग्रस्तांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले. योग्य वेळी मिळालेली मदत अनेकांचे जीव वाचवू शकते, असेही त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमाला डॉ. अब्दुल खान, डॉ. मंगेश चव्हाण, अमित वाडे, लक्ष्मण जाधव, ट्राफिक प्रभारी एपीआय अनिल व्हटकर, रेजिलेंट इंडिया संस्थेच्या भारती पाटील, निलेश पाटील, मयूर ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाभरातील ५० ते ६० हून अधिक पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने प्रशिक्षणासाठी सहभागी झाले होते.यावेळी ट्राफिक विभागाच्या वतीने रेजिलेंट इंडिया संस्थेच्या सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

विशेष म्हणजे, या प्रशिक्षण कार्यक्रमात एसपी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांची उपस्थितीही लक्षणीय होती. कार्यक्रमामुळे आपत्कालीन परिस्थितीत अधिक समन्वयाने आणि तातडीने सेवा देण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *