आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते पालघर तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार संपन्न

Spread the love

शिक्षण विभाग पंचायत समिती पालघर आयोजित तालुकास्तरीय आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२५-२०२६ सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती मंडळ सभागृह येथे मान्यवर गट विकास अधिकारी संजय भोये, गट शिक्षण अधिकारी, शैलेश सुर्वे, विस्तार अधिकारी, माधवी दवणे(तांडेल), राजेश माळी, विल्मा पेन, वंदना पाटील, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक शिक्षकवृंद, सत्कारमूर्ती आदर्श शिक्षक व परिवार समवेत संपन्न झाला.

पालघर तालुक्यातील ३६ आदर्श शिक्षकांना त्यांच्या विविध कौशल्य युक्त शिक्षकांना गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शिकानांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना राजेंद्र गावित हे शिक्षकांचे आधारवड संकटमोचक असल्याचे सांगून वस्तीशाळा, पेसा भरती, नॉन पेसा शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *