Relieef Hospitals तर्फे रक्तदान शिबिर यशस्वी; “रक्तदान हेच जीवनदान”चा संदेश

Spread the love

पालघर | प्रतिनिधी

पालघर व बोईसर परिसरात सामाजिक बांधिलकी जपत Relieef Hospitals यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडले. दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या या शिबिरात एकूण ४० रक्तदात्यांनी स्वेच्छेने सहभाग नोंदवत रक्तदान केले.समाजात रक्तदानाविषयी जनजागृती निर्माण करणे आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.

शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, विविध वयोगटातील रक्तदात्यांनी सामाजिक कर्तव्य म्हणून सहभाग घेतला.या उपक्रमाचे आयोजन Smt. D. K. Chheda Blood Bank & Component Centre, डहाणू यांच्या सहकार्याने करण्यात आले. शिबिरादरम्यान वैद्यकीय पथकाने रक्तदात्यांची तपासणी करून सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने रक्तसंकलन प्रक्रिया पूर्ण केली.Relieef Hospitals हे “Expertise | Technology | Humanity” या तत्वांवर कार्यरत असून, आधुनिक आरोग्यसेवा पुरवण्याबरोबरच सामाजिक उत्तरदायित्व जपण्यासही प्राधान्य देत आहे. अशा उपक्रमांमधून संस्थेची समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित होत आहे.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्व रक्तदाते, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आभार मानण्यात आले. तसेच नागरिकांनी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले.“रक्तदान हेच जीवनदान” हा संदेश देत या उपक्रमाने समाजात एक सकारात्मक व प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *