दुर्वेश ट्राफिक चौकीत ‘Good Samaritan 108’ ऍपची माहिती; अपघातग्रस्तांना तत्काळ मदतीचा नवा मार्ग

Spread the love

पालघर | प्रतिनिधी
रुग्णांच्या आपत्कालीन सेवेसाठी बीव्हीजी (BVG) कंपनीतर्फे विकसित करण्यात आलेल्या ‘Good Samaritan 108’ या ऍपची माहिती आज दुर्वेश ट्राफिक चौकी येथे देण्यात आली. यावेळी डॉ. वेद व्यास मोरे आणि लक्ष्मण जाधव यांनी उपस्थित मृत्युंजय दूत आणि ट्राफिक पोलिसांना ऍपच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
या ऍपच्या माध्यमातून नागरिकांना अपघात किंवा इतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळवणे शक्य होणार आहे. घटनास्थळाचे फोटो व व्हिडिओ अपलोड करून रुग्णाची स्थिती संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवता येते, ज्यामुळे वेळेवर रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास मदत होते.
या प्रसंगी मृत्युंजय दूत तथा रेझिलेंट इंडिया चे सदस्य हरबन्स सिंग नन्नाडे, भारती पाटील, मयूर ठाकूर, अखिल सय्यद, रविश नाचणं तसेच ट्राफिक पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अधिकाऱ्यांनी सांगितले की, नागरिकांनी या ऍपचा जास्तीत जास्त वापर करून अपघातग्रस्तांना ‘गुड सेमेरिटन’ म्हणून मदतीचा हात द्यावा, जेणेकरून अनेकांचे जीव वाचू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *