मराठी शाळेत ७ टॉयलेट असताना ८ व्या बांधकामाचा धक्कादायक प्रकार…?

वाडा | प्रतिनिधी
वाड्या शहरातील भूमि अभिलेख कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या मराठी शाळेच्या परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमध्ये गंभीर अनियमितता समोर आली आहे. पाहणीदरम्यान या ठिकाणी आधीच सात टॉयलेट-बाथरूम अस्तित्वात असतानाही, कोणतीही ठोस गरज नसताना आठवे टॉयलेट बांधण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
या संशयास्पद प्रकाराविरोधात सामाजिक कार्यकर्ता योगेश वाघ यांनी जाहीरपणे आवाज उठवला आहे. हे विकासकाम शाळेतील विद्यार्थी किंवा शिक्षकांच्या गरजेसाठी नसून, फक्त कंत्राटदाराच्या आर्थिक फायद्यासाठीच राबवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सार्वजनिक निधीचा असा अपव्यय होत असल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत असून संबंधित यंत्रणांनी तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.