वेदांता मेडिकल कॉलेज धुंडलवाडी येथे कामगारांचा बेमुदत संप;

Spread the love

पगारवाढ आणि सुविधांसाठी आंदोलन तापले

धुंडलवाडी (पालघर)

वेदांता मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, धुंडलवाडी येथे काम करणाऱ्या कामगारांनी पगारवाढ आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागण्यांसाठी बेमुदत संपाचा इशारा देत आंदोलन पेटवले आहे. हे आंदोलन डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असून दिवसेंदिवस या आंदोलनाला वेग मिळताना दिसत आहे.

कामगारांचा आरोप आहे की, कॉलेजकडून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी आणि देणगी (Donation) घेतली जात असतानाही कामगारांना योग्य ते वेतन, सुविधा आणि सुरक्षित कामाचे वातावरण देण्यात येत नाही. मजुरांना योग्य पगार, ओव्हरटाइम, रजा, आरोग्य सुविधा तसेच इतर कायदेशीर हक्क नाकारले जात असल्यामुळे असंतोष निर्माण झाला असून अखेर कामगार संघटनांनी संपाचे हत्यार उगारले.

आमदार विनोद निकोले यांनी कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. कामगारांच्या न्याय्य प्रश्नांकडे वेदांता प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत तातडीने तोडगा काढावा, अन्यथा व्यापक आंदोलन उभे करण्याचा इशारा त्यांनी दिला.

या संपामुळे हॉस्पिटलमधील कामकाजावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रुग्णसेवा आणि हॉस्पिटल व्यवस्थापनावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

कामगारांच्या मागण्यांमध्ये—

  • योग्य पगारवाढ
  • कायदेशीर सुविधा / लाभ
  • सुरक्षित आणि मानवीय कामकाज
  • स्थिर नोकरी हमीया प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

दरम्यान, वेदांता मेडिकल कॉलेज प्रशासनाकडून या संदर्भात कोणतेही अधिकृत निवेदन अद्याप प्राप्त झालेले नाही. संघर्ष वाढत असताना सर्वांचे लक्ष आता प्रशासन आणि सरकार कोणता निर्णय घेते याकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *