तारापूर MIDC मध्ये ट्रेलरची ‘दादागिरी राज’! रोड दोन्ही बाजूंनी कब्जा;

Spread the love

“हप्ता देतो, काही होत नाही” अशी निर्लज्ज उघडकी — मग हा हप्ते खोर ‘साहेब’ कोण….?

तारापूर (विशेष प्रतिनिधी)

तारापूर MIDC परिसरात कायदा मरून बसलाय का? पोलीस आणि MIDC प्रशासन झोपेत आहे का? की हप्त्याच्या उकळ्यावर संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली आहे? कारण, तारापूर MIDC मधील करमतारा इंजिनीरिंग प्रा. लि. (B-8/2) परिसरात येणारे ट्रेलर चालक रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ट्रेलर उभे करून सरळ सार्वजनिक रस्ताच कब्जात घेतात, अशी संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

रस्त्यावरच कागदपत्र तपासणी, व्यवहार, वजन प्रक्रिया चालते… आणि नागरिक, कामगार, प्रवासी यांचे जीव धोक्यात पडतात. वाहतूक खोळंबते, अपघाताचा धोका वाढतो… पण प्रशासन मूकबधिर!

याहून धक्कादायक म्हणजे—ट्रेलर हटवायला सांगितल्यावर काही चालक सरळ छाती ठोकून उत्तर देतात:

👉 “आम्ही साहेबांना हप्ता देतो… आम्हाला कोणी काही करू शकत नाही!”

म्हणजे थेट कबुली!मग प्रश्न सरळ आहे—

  • 🔥 हा ‘हप्तेखोरीचा’ डॉन कोण?
  • 🔥 अवैध पार्किंगला संरक्षण देणारा ‘साहेब’ नक्की कोण?
  • 🔥 पोलीस, MIDC अधिकारी, वाहतूक विभाग यांचं नेमकं चाललंय तरी काय?
  • 🔥 कायद्याच्या नावावर केवळ कागदोपत्री कारवाई आणि प्रत्यक्षात हप्त्याचा खेळ?

तारापूर MIDC हा औद्योगिक महत्त्वाचा भाग… पण सध्या माफिया स्टाईल व्यवस्थापन सुरू असल्याचे चित्र आहे. नागरिक, कामगार आणि वाहनचालकांच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, ट्रेलरचालकांवर कठोर कारवाई करावी आणि ‘तो साहेब’ सार्वजनिकपणे उघड करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *