प्रदीप यादव यांची भाजपा पालघर जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती

Spread the love

पालघर | प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्याच्या दृष्टीने प्रदीप यादव यांची भाजपा पालघर जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी आपला विश्वासू आणि संघटनेसाठी सातत्याने कार्यरत असलेले कार्यकर्ते म्हणून प्रदीप यादव यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली असल्याची चर्चा पक्ष वर्तुळात सुरू आहे.

प्रदीप यादव हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात सक्रिय असून पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवत संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या नेतृत्वाखाली भाजपा संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रदीप यादव प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर भाजपा कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून जिल्ह्यातील विविध भागांत स्वागत करण्यात येत आहे.नियुक्तीनंतर प्रदीप यादव यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, “पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडणार असून कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार,” असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *