जागतिक महिला दिनी पालघरमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार

Spread the love

पालघर | ( पालघर )दुर्वा पाटील
जागतिक महिला दिनानिमित्त पालघर शहरात विश्वास फाउंडेशन तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले. समाजातील महिलांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती लाभली.


या कार्यक्रमात समाजसेविका भारती पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सामाजिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेत भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने आवाज उठविणे तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे या त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.
भारती पाटील या सध्या रेझीलेंट इंडिया या संस्थेसोबत रस्ते सुरक्षेसंदर्भात जनजागृतीचे महत्त्वपूर्ण काम करत आहेत. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करणे, रस्ते सुरक्षेचे महत्त्व पटवून देणे तसेच संबंधित प्रशासनाकडे आवश्यक सुधारणा करण्याची मागणी करणे अशा विविध उपक्रमांद्वारे त्या कार्यरत आहेत.


कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी महिलांचे समाजातील योगदान अधोरेखित करत महिलांनी सर्व क्षेत्रात पुढे येऊन समाज परिवर्तनासाठी काम करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करून त्यांना शाल,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमामुळे पालघरमध्ये महिला सशक्तीकरणाचा सकारात्मक संदेश दिला गेला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *